क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Crime News : कल्याण गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम – शिकलकर टोळीचा पर्दाफाश, ३९.५३ लाखांचा ऐवज हस्तगत

कल्याण | ठाणे आणि नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या शिकलकर टोळीचा कल्याण गुन्हे शाखेने थरारक सापळा रचून पर्दाफाश केला. Kalyan Crime News

धडाकेबाज कारवाईत अटक आरोपी
1️⃣ विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय २४)
2️⃣ सोनुसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (वय २७)
3️⃣ सन्नी करतारसिंग सरदार (वय २७)
4️⃣ अतुल सुरेश खंडाळे (वय २४)

या चौघांनाही गुप्त माहिती व तांत्रिक तपासावरून कल्याण परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत ठाणे व नवी मुंबई आयुक्तालयातील ४० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

जप्त मुद्देमाल

सोन्या–चांदीचे दागिने आणि रोकड : ₹३९,५३,०००

गुन्ह्यात वापरलेली टोयोटा इनोव्हा चारचाकी : ₹१० लाखांपेक्षा अधिक किंमत

या टोळीवर आधीच पुणे, जळगाव, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईसह राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, फसवणूक आणि मकोकासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

धडाकेबाज तपासाची सूत्रधार टीम
ही मोहीम पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उप पोलीस आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांचे सहकारी अधिकारी-अंमलदारांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0