मुंबई

Kirit Somaiya : मुंबईत भाजपचा ‘फेरीवाला मुक्त’ एल्गार! मुलुंडमधून मोहिमेला सुरुवात; बांगलादेशी घुसखोरांविरोधात किरीट सोमय्या आक्रमक

•रेल्वे स्थानकांचा 100 मीटर परिसर होणार मोकळा; पुढील 15 दिवसांत ईशान्य मुंबईतील उपनगरांमध्ये धडक कारवाईचा इशारा

मुंबई | मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद आणि बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या संख्येविरोधात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात आज मुलुंड येथून ‘बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई’ अभियानाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या मोहिमेमुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात मोठी ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

मुलुंडमधून मोहिमेचा श्रीगणेशा

आज सकाळी मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात किरीट सोमय्या, माजी खासदार मनोज कोटक आणि आमदार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसर प्रवाशांसाठी चालण्यायोग्य करणे आणि अनधिकृत घुसखोरांनी केलेले अतिक्रमण हटवणे हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

100 मीटरचा नियम आणि ‘मुंब्रा’ टार्गेट

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या आणि प्रशासकीय नियमांनुसार रेल्वे स्थानकापासून 100 मीटरच्या परिघात एकही फेरीवाला बसता कामा नये. या नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल. आमचे मुख्य लक्ष मुंबईतील मुंब्रा आणि ज्या भागांत बांगलादेशी माफियांनी पाय पसरले आहेत, तो परिसर फेरीवाला मुक्त करण्यावर आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0