Uddhav Thackeray : “एक तर तू राहील नाहीतर मी राहील..”उद्धव ठाकरे आक्रमक, फडणवीस यांनी चार शब्द दिले उत्तर

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल, भाजप म्हणजे “चोर कंपनी”.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वीच Vidhan Sabha Election राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप ची मालिका चालू झाली आहे. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray Melva यांनी काल पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की होऊन जाऊ दे यापुढे जे काय व्हायचे ते एक तर तू राहशील नाहीतर मी राहील अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आता विधानसभेच्या तयारीला लागले आहे गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे पक्षांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना भेट घेत आहे मेळाव्या घेत आहे. काल झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला चोर कंपनी असे म्हटले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलेच यश मिळाले आहे. जनतेचा कौल विधानसभेलाही आपल्या बाजूने असल्याचा महाविकास आघाडीचा दावा आहे. तर भाजप आणि इतर महायुतीतील नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुरुंग लावण्याचे काम चालू आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या पक्षामध्ये झालेल्या गद्दारीवरून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक तर तू राहशील नाहीतर मी राहील असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना दिले. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आव्हानाला किंवा चार शब्दात उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”योग्य वेळी उत्तर देऊ”उद्धव ठाकरे यांच्या आव्हानावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.