क्रीडा
Cricket Update : इंग्लंडने भारताला दिले 249 धावांचे टार्गेट, जडेजा-राणा यांची भेदक गोलंदाजी

India Vs England ODI Latest Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे.
IND vs ENG 1st ODI :- इंग्लंडने भारताला विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून गोलंदाजांमध्ये हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा यांनी कमाल दाखवली.
इंग्लंडने 47.4 षटकांत सर्वबाद 248 धावा केल्या. फिलिप सॉल्टने 43 धावांची खेळी केली. बटलरने 52 धावांची दमदार खेळी केली. बेथेलने 51 धावांचे योगदान दिले. डकेटने 32 धावा केल्या. अखेरीस जोफ्रा आर्चर 21 धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून हर्षित राणाने 7 षटके टाकली. यादरम्यान त्याने 53 धावांत 3 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 9 षटकांत 26 धावा देत 3 बळी घेतले. मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.