Honey Trap News : डेटींग ॲपवर ‘हनी ट्रॅप’! – ऑनलाईन भेट, ‘ड्रिंक’मध्ये गुंगीचं औषध; मुंबईजवळ 2 सराईत महिलांकडून पुरुषांना लुटण्याचा थरार!

Malad Honey Trap News : बदनामीच्या भीतीने अनेक पीडित गप्प; मांडवी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, ‘मालाड’च्या महिला आरोपींकडून 4 लाखांहून अधिकचा ऐवज जप्त
विरार :- ऑनलाईन डेटींग Online Dating Appॲप्सचा वापर करून पुरुष शिकार शोधायची आणि भेटीच्या बहाण्याने त्यांना गुंगीचे औषध देऊन मौल्यवान दागिने आणि वस्तू लुटायच्या, अशा पद्धतीचा वापर करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना मांडवी पोलिसांनी Mandvi Police जेरबंद केले आहे. या ‘झोपी’च्या डावात अनेक पुरुष गप्प बसत असल्याने महिला आरोपींचा आत्मविश्वास वाढला होता, मात्र पोलिसांनी ही टोळी उद्ध्वस्त केली आहे. Mumbai Latest Honey Trap News
लॉजवर भेट, मग चोरी
विरारमधील एका 31 वर्षीय पुरुषाने मांडवी पोलीस ठाण्यात Mandvi Police News तक्रार दिली होती. त्यानुसार ‘हॅपन डेटींग ॲप’वर ओळख झाल्यानंतर त्याने एका अनोळखी महिलेला भेटण्याचे ठरवले. भेटीसाठी लॉजवर एकत्र आल्यानंतर या महिलेसोबत तिची आणखी एक साथीदार आली. लॉजमध्ये दारू पित असताना फिर्यादीच्या नकळत त्याच्या ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या टाकण्यात आल्या. फिर्यादी गाढ झोपल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याची चेन, मोबाईल आणि स्मार्ट वॉच असे 1.83 लाख किंमतीचे साहित्य चोरून महिला पसार झाल्या.याच पद्धतीने या आरोपींनी दुसऱ्या दिवशी रात्री काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका पुरुषाला लुबाडले होते.


सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञानाने झाला छडा
गुन्हा केल्यानंतर आरोपी महिलांनी तात्काळ डेटींग ॲपवरील प्रोफाईल आणि सर्व माहिती डिलीट केली होती. लॉजमध्येही अस्पष्ट आयडी आणि चुकीचे क्रमांक दिले होते. कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, पोलिसांनी लॉजवरील अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचे जाळे विणले. या आधारावर, मालाड (प.) मुंबई येथील रहिवासी असलेल्या 28 आणि 29 वर्षीय दोन महिला आरोपींना मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासामध्ये महिलांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला 4.13 लाख किंमतीचा मुद्देमाल, दागिने, मोबाईल हँडसेट आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
महिला आरोपींचे नियोजन
तपासामध्ये पोलिसांनी एक धक्कादायक बाब उघड केली. या महिला आरोपींनी अनेक पुरुष बदनामीच्या भीतीने तक्रार करणार नाहीत, हे लक्षात घेऊन पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हे केले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात गुंगीकारक औषध वापरल्यामुळे आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123 हे वाढीव कलम लावले आहे.
या टोळीच्या फसवणुकीचे बळी ठरलेल्या आणि बदनामीच्या भीतीमुळे गप्प बसलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


