Virar Crime News : “काम देतो” म्हणत मजुराचा मोबाईल लंपास; ‘स्मार्ट’ चोर ‘गुन्हे शाखा’च्या जाळ्यात!

Virar Crime Branch 3 News : विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ची झटपट कारवाई; गोरेगावहून आरोपी अटकेत
विरार :- काम देण्याचे आमिष दाखवत एका मजुराची फसवणूक करणाऱ्या ‘हुशार’ चोराला गुन्हे शाखा कक्ष-3, Virar Crime Branch 3 विरारच्या पोलिसांनी केवळ 24 तासांत गोरेगाव येथून अटक करून जेरबंद केलं आहे. आरोपी सुरज विजयबहादुर गुप्ता (वय 32) याने मोबाईलमधून फोनपेचा पासवर्ड घेत फसवणूक केली होती. Virar Latest Crime News
मोबाईल व पैसे घेऊन फरार झालेल्या आरोपीकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा
14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता, नालासोपारा पूर्वेतील तुळिंज ओव्हर ब्रिज खाली कामाच्या शोधात थांबलेल्या जिबराईल मंसुरी (22 वय) या मजुराला आरोपीने “काम आहे” असं सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फोनपेवर पैसे मागवतो म्हणत पासवर्ड घेतला आणि मोबाईल घेऊन “फोन करतो” असं सांगून फरार झाला. काही क्षणांत मजुराची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-3 च्या टीमने तपास सुरू केला. 15 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे गोरेगाव येथून आरोपी सुरज गुप्ताला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात त्याच्यावर आधीपासून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
ही कौशल्यपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
या पथकामध्ये मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, युवराज बाघमोडे, सुमित जाठे, आतिश पवार यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांचा मोलाचा सहभाग राहिला.


