मुंबई

Mira Bhayandar Crime News : 2.40 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त, काशिमिरा पोलिसांचे ड्रग्ज रॅकेटवर मोठे यश

•दोन आरोपींकडून 10 ग्रॅम हेरॉईन जप्त, तिसऱ्या पुरवठादारालाही अटक

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. तब्बल 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा 20 ग्रॅम वजनाचा हेरॉईन अंमली पदार्थ जप्त करत पोलिसांनी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. याच मोहिमेअंतर्गत 8 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काशिमिरा पोलिसांनी सापळा रचला.

दहिसर सर्व्हिस स्टेशन पेट्रोल पंपाजवळ, मुंबई-अहमदाबाद हायवे येथे पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये रमजान जलील अहमद अन्सारी (वय 34) आणि आसिफ हारुण खान (वय 20) यांच्याकडून प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचा हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे.

पोलिसांनी या दोघा आरोपींची अधिक चौकशी केली. त्यावेळी आरोपी आसिफ खानच्या सुझुकी बर्गमन स्कूटरच्या डिक्कीमध्ये आणखी 10 ग्रॅम हेरॉईन सापडले. हेरॉईन, स्कूटर, आणि रोख रक्कम मिळून पोलिसांनी एकूण 3 लाख 25 हजार 893 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या दोघांना ड्रग्ज पुरवणारा मुख्य आरोपी जुबेर इबारतअली शेख (वय 50) यालाही पोलिसांनी 13 ऑगस्ट रोजी अटक केली. आरोपी जुबेर शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 7 गुन्हे दाखल आहेत, तर रमजान अन्सारीवर 1 गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त राहुल चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे आणि पोलीस निरीक्षक शितल मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0