IPS Officer Transfer : 12 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, पुणे, नागपूर व पिंपरी-चिंचवडमध्ये जबाबदाऱ्यांत बदल

IPS Officer Transfer : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासनात नवचैतन्याची शक्यता ; मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांत बदल्यांची लाट
मुंबई :- राज्याच्या पोलीस दलात मोठ्या स्वरूपात प्रशासनिक बदल करण्यात आले आहेत. IPS Officer Transfer गृह विभागाच्या आदेशानुसार एकाच दिवशी 12 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या. या बदल्यांमुळे राज्यातील गुन्हे अन्वेषण, वाहतूक, दहशतवादविरोधी आणि अमली पदार्थविरोधी विभागांत नवे नेतृत्व रुजू होणार आहे.
या आदेशामुळे मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांतील पोलीस आयुक्तालयांच्या नेतृत्वात मोठा फेरबदल झाला असून कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनाला नवसंजीवनी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
12 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
अनिल पारस्कर – अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई येथे नियुक्त, यापूर्वी ते सुरक्षा शाखेत कार्यरत होते.
रविंद्र शिंगवे – अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर येथून बदली होऊन मुंबई गुन्हे विभागात.
एम. रामकुमार – वाहतूक विभागातून बदली होऊन महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात संचालक म्हणून नियुक्त.
शशिकुमार मीणा – अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग, मुंबई.
प्रविण पाटील – पुणे शहरातून बदली होऊन नागपूर शहरात.
संजय बी. पाटील – नागपूर शहरातून पुणे शहरात.
वरसंग परदेशी – पिंपरी-चिंचवड येथून नागपूर शहरात.
एस.डी. आहेर – गुन्हे अन्वेषण विभागातून बदली होऊन पिंपरी-चिंचवड येथे.
एस.टी. राठोड – नागपूर येथून अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये.
पी.डी. शेलके – नागपूर येथून दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे.
एस.ए. चावरिया – पुणे येथून बदल्या करणे बाकी.
विनिता साहू – सुरक्षा विभागातून सरसंचालक कार्यालयात.
या बदल्यांमुळे महाराष्ट्र पोलीस दलात कामकाजाच्या गती आणि गुन्हेगारी नियंत्रणामध्ये परिणामकारक बदल अपेक्षित आहे.


