पुणे

Parinay Fuke : भाजप नेते परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, सुन प्रिया फुकेचे गंभीर आरोप

•शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे प्रिया फुकेच्या पाठीशी उभ्या — पत्रकार परिषदेत फोडला धक्कादायक गौप्यस्फोट!

पुणे :- भाजप नेते आणि विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील प्रचंड वाद आता लोकांसमोर उघड झाला आहे — आणि हे प्रकरण केवळ कौटुंबिक नाही, तर महिलांवरील अन्याय आणि राजकीय सत्तेचा गैरवापर दर्शवणारं आहे. परिणय फुके यांच्या धाकट्या भावाची पत्नी प्रिया फुके यांनी आज एक थरारक आणि धक्कादायक पत्रकार परिषद घेऊन सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले.

“मी दीड वर्षांपासून पोलीस ठाण्यांचे उंबरठे झिजवते आहे. मुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना भेटले. पण कोणीही मदतीला आलं नाही. पण आज या दोन बहिणी — सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे — माझ्या पाठीशी उभ्या आहेत.” असं सांगत प्रिया फुके भावनिक झाल्या.

त्यांनी पुढे सांगितले, “माझं लग्न 2012 मध्ये संकेत फुके यांच्याशी झालं. पण त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झाला होता, हे आम्हाला सांगितलंच नाही. जेव्हा मला हे कळलं आणि मी विचारलं, तेव्हा मला धमक्या मिळाल्या. ‘बोललीस तर बलात्कार करायला तुझ्या घरी माणसं पाठवू’ — अशा घाणेरड्या धमक्या दिल्या गेल्या.”

संकेत फुके यांच्या निधनानंतरही छळ सुरुच राहिला. प्रिया फुके यांनी आरोप केला की संपत्तीच्या वादातून सासरकडील लोकांनी एक दिवस रात्री 10.30 वाजता त्यांना घराबाहेर काढलं. “माझ्या मागे अजूनही लोक लागले आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आजही सुरक्षित नाही.”

या पत्रकार परिषदेमुळे फुके कुटुंबातील वाद राजकीय रंग घेऊ लागला आहे. कारण भाजपच्या नेत्याच्या कुटुंबातील महिला असा आवाज उठवत असेल, तर इतर सामान्य महिलांची परिस्थिती किती भीषण असेल, असा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0