Maharashtra IPS Transfer List : राज्यातील सात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Maharashtra IPS Transfer List : रविंद्र शिसवे गुप्तवार्ता विभागात, तर शारदा निकमांची बदली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये
मुंबई :-राज्य सरकारने पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडाका कायम ठेवत राज्यातील एकूण सात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. IPS Officer Transfer त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
1.रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
2.शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
3.निस्सार तांबोळी – विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
4.एन डी रेड्डी – पोलिस सहआयुक्त, नागपूर
5.सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
6.राजीव जैन – विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
7.अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन
वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची बदली करण्यात आली असली तरी ठिकाणी अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. त्यांच्या बदलीचे ठिकाण नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.


