क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Sex Racket : मासाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; गोवंडी पोलिसांची कारवाई

Mumbai Police Busted Govandi Sex Racket : देवनार येथील स्पावर छापा, दोन मुलींची सुटका आणि तिघांना अटक

मुंबई :- शीव-पनवेल महामार्गावरील देवनार परिसरात असलेल्या एका मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या एका पथकाने शुक्रवारी (20 सप्टेंबर) सायंकाळी येथे छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली आहे, तर पार्लर चालवणाऱ्या एका महिलेसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Mumbai Police Latest Crime News

मासाजच्या नावाखाली गैरकृत्य

पोलिसांना गेल्या काही दिवसांपासून देवनार येथील मारिया स्पा नावाच्या पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळत होती. या माहितीच्या आधारे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-6 कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी सायंकाळी पार्लरवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. Mumbai Police Busted Govandi Sex Racket

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. तसेच, या गैरकृत्याला जबाबदार असलेल्या एका महिलेसह दोन पुरुषांना अटक करण्यात आली. या तिघांविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0