Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक यांचे भेट, लाडकी बहीण योजने’चा 1500 रूपयांचा चेक

•पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते Ambadas Danve यांनी घेतले भेट
मुंबई :- बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट काल (21 ऑगस्ट) घेतली होती.बदलापूरच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात पाहायला मिळत आहेत. बदलापूरमध्ये झालेले आंदोलनात तब्बल 10 ते 12 तास आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर ठिय्या आंदोलन केले. मात्र या आंदोलनात लाडकी बहीण योजेनचे फलक देखील झळकाविण्यात आले. त्यामुळे या आंदोलनात राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. असं घडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.

अंबादास दानवे आणि ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यानी रश्मी शुक्ला यांना लाडकी बहीण योजनेचा 1500 रूपयांचा प्रतीकात्मक चेक दिला आहे. मात्र रश्मी शुक्ला यांनी तो चेक स्वीकारले नसल्याचे समजते आहेत. बदलापूर येथील घटनेमुळे महिलांच्या मनात असुरक्षितेतची भावना निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत.रश्मी शुक्ला यांनी तो प्रतीकात्मक चेक स्वीकारण्यास नकार दिला. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर व व्यवस्थापनावर कारवाई व्हावी असे निवेदन अंबादास दानवे यांनी दिले आहे.