क्रीडा

IPL 2025 : RCBचा विजयगर्जा! ऐतिहासिक रनचेसने लखनौवर मात करत क्वालिफायरमध्ये धडक

जितेश शर्माची 85 धावांची तुफानी खेळी, RCBचा 227 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी

IPL2025 :- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक खेळत लखनौ सुपर जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव करत क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयाने केवळ प्लेऑफमध्ये त्यांची वाटचाल पक्की केली नाही, तर त्यांनी संघाच्या इतिहासातील सर्वात मोठं लक्ष्य पार करण्याचा पराक्रम देखील केला.

227 धावांचे लक्ष्य पार करताना RCBने आक्रमक सुरुवात केली. विराट कोहली आणि फिल सॉल्टने अवघ्या 5 षटकांत 60 धावांची भागीदारी केली. सॉल्टने 30 धावा केल्या, तर विराट कोहलीने 10 चौकारांसह 54 धावांची शानदार खेळी केली. रजत पाटीदार झटपट बाद झाल्यावर मैदानात उतरले मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा.

या दोघांनी लखनौच्या गोलंदाजीवर धावांचा वर्षाव करत सामना RCBच्या बाजूने वळवला. मयंकने 41 धावांची संयमी पण महत्त्वाची खेळी केली, तर जितेश शर्माने अवघ्या 33 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकार ठोकत 86 धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीमुळे RCBने अवघ्या 8 चेंडू शिल्लक ठेवत हा थरारक सामना जिंकला.

हा विजय केवळ एक सामना जिंकण्यापुरता मर्यादित नाही. RCBने यासह आयपीएलमध्ये घरच्या मैदानाबाहेर सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. आता ते प्लेऑफमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळणार असून अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे दोन संधी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0