Thane Drug Racket : ड्रग्ज, पिस्तूल आणि काडतूस! – ठाणे पोलिसांची ‘ऑपरेशन क्लीन’ मोहीम, सराईत गुन्हेगारांकडून 11 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Thane Police Latest Drug Busted News : कल्याण पूर्व येथे खंडणी विरोधी पथकाचा धडक छापा; एमडी ड्रग्ज विक्री रॅकेटचा पर्दाफाश, पिस्तूल पुरवणाऱ्या दुसऱ्या आरोपीलाही तात्काळ अटक
ठाणे :- ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch खंडणी विरोधी पथकाने कल्याण पूर्व परिसरात अंमली पदार्थ आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे. या ‘ऑपरेशन क्लीन’ मोहिमेत पोलिसांनी एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज सह गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे, ज्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. Thane Latest Crime News
गुन्हेगार जाळ्यात
गोपनीय माहितीच्या आधारे, 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री उशिरा कल्याण पूर्व, ढोकाळी येथील एका निवासी इमारतीवर खंडणी विरोधी पथकाने छापा टाकला.आकिब इकबाल बागवान (वय 33) याच्याकडून 108.8 ग्रॅम वजनाचा, आंतरराष्ट्रीय बाजारात 10.88 लाख किंमत असलेला एम.डी. ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.या ड्रग्ज विक्रेत्याकडे 50 हजार किंमतीचे एक गावठी पिस्तूल (अग्नीशस्त्र) विनापरवाना आढळले.
पिस्तूल पुरवठादारही गजाआड
आरोपी आकिब बागवान हा मानपाडा पोलीस स्टेशनमधील दोन गंभीर एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आहे. त्याच्या चौकशीतून हे अग्नीशस्त्र भरत शत्रुध्न यादव याने पुरवल्याचे उघड झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी लगेच भरत यादवचा शोध घेऊन त्यालाही अटक केली आणि त्याच्याकडून एक जिवंत काडतूस जप्त केले.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून अंमली पदार्थ, पिस्तूल आणि काडतूस असा एकूण 11.41 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, खंडणी विरोधी पथक पुढील तपास करत आहे.


