Sangli Crime News : सहपाठींचा विश्वासघात! थिएटरच्या नावाखाली फ्लॅटवर नेऊन वैद्यक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

•सांगलीत संतापजनक प्रकार; आरोपी पुणे, सोलापूर आणि सांगलीचे 27 मेपर्यंत पोलीस कोठडीत. नशेचे पेय देत बेहोश करून तरुणीवर बलात्कार बेलगावीच्या पिडितेची पालकांकडे कैफियत; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
सांगली :- सांगली जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे, जिथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिचेच दोन सहपाठी आणि त्यांच्या एका मित्राने सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 मे रोजी रात्री घडली.
तिघांनी मिळून तिला थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचे आमिष दाखवले आणि त्याऐवजी एका फ्लॅटवर नेऊन नशेचे पेय दिले. नशेच्या अवस्थेत असताना तिघांनी तिच्यावर अत्याचार केला आणि कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.
पीडित तरुणी मूळची कर्नाटकातील बेलगावी येथील असून, तिने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून ते पुणे, सोलापूर आणि सांगलीचे रहिवासी आहेत. त्यांना 27 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पिडित विद्यार्थिनी मूळची कर्नाटकातील बेलगावीची असून, तिने संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम 376 (डी) (, 328, 506 व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.पीडितेच्या जबाबावरून तपास अधिक सखोल केला जात आहे.



