मुंबई

Karuna Sharma : करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे… न्यायालयाच्या निकालानंतर करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया

•मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख 25 हजार आणि मुलीला 75 हजार रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई :- मंत्री धनंजय मुंडे हे कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेले नाव असल्यामुळे त्यांच्या काय अडचणी कमी होताना दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे करुणा शर्मा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख 25 हजार रुपये तर त्यांची मुलगी शिवानी हिला दरमहा 75 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तसेच खटला लढवण्यासाठी करुणा शर्मा यांना 25 हजार खर्च देण्याचाही आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी करुणा शर्मा नसून करुणा धनंजय मुंडे आहे अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये न्यायालयाने निर्णय देताना धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून करुणा शर्मा असल्याचे मान्य केले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर करुणा मुंडे यांनी म्हटले आहे की न्याय जिंकला हीच माझी पहिली प्रतिक्रिया असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट शेअर करत करुणा मुंडे यांचे अभिनंदन केले आहे. तर तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांच्या पापाचा घडा भरला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांची पोस्ट?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.’

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. हे गंभीर प्रकरण आहे. आतापर्यंत धनंजय मुंडेंनी राजकीय दबावापोटी आणि पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केली आहेत. मला वाटते आता पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसे आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. ही टोळी त्यांच्या जवळची होती, हे माहीत आहे. त्यामुळे मुंडे यांनी नैतिकतेने राजीनामा द्यायला हवा होता. पण त्यांनी दिला नाही. सर्व पुरावे आले आहेत. अजूनही त्यांचा राजीनामा होत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0