क्राईम न्यूजनाशिकनाशिक
Trending

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई! – सिन्नर तहसीलदारांनंतर आता महापालिका लिपिक 7 हजारांची लाच घेताना जेरबंद

Nashik Latest Bribe Case : दिव्यांग दुकान चालकाकडून लाच घेताना राजेंद्र बोरकडे एसीबीच्या जाळ्यात; सिन्नर तहसीलदाराला 2.5 लाखांच्या लाचेसह अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ

नाशिक :- नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आपली कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.Nashik ACB सिन्नरच्या तहसीलदारांना कालच रंगेहात पकडल्यानंतर आज पुन्हा नाशिक महानगरपालिकेतील एका कनिष्ठ लिपिकास लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने नाशिकमधील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Nashik Latest Bribe Case

दिव्यांग दुकान चालकाकडून लाच घेताना लिपिक जाळ्यात

लाचखोर लिपिक राजेंद्र बोरकडे याचे नाव असून तो महानगरपालिकेत कार्यरत होता. येथील एका दिव्यांग दुकान चालकाकडून त्याची गाडी सोडून देण्याच्या बदल्यात त्याने 18 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 7 हजार रुपये स्वीकारताना हा लिपिक एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडला. राजेंद्र बोरकडे याला महापालिकेतून थेट एसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांना 2.5 लाखांसह अटक

विशेष म्हणजे लाचलुचपत विभागाकडून नाशिकमध्ये दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई आहे. दोनच दिवसांपूर्वी सिन्नरचे तहसीलदार संजय धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आले होते. जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तहसीलदाराने तक्रारदाराकडे तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीत अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने सोपान हॉस्पिटलसमोर धाड टाकून त्यांना अटक केली.

प्रशासनातील भ्रष्टाचारावर संताप, सर्वसामान्यांकडून स्वागत

या दोन दिवसांतील धडाकेबाज कारवाईनंतर महसूल विभाग आणि महानगरपालिका अशा दोन्ही महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांत मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनातील भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, याबद्दल सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, एसीबीच्या या कारवाईचे मात्र मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0