Bhiwandi Crime News : भिवंडीत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; साडे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

•स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. लॅपटॉप, प्रिंटर व इतर साहित्य तसेच बनावट नोटांचा बंडल, बॉन्ड पेपर असा 45 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिवंडी :- भिवंडी पोलिसांच्या स्थानिक गुन्ह शाखा कक्ष-2 बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सहा जणांच्या टोळीकडून संगणक, प्रिंटर व बनावट नोटांचा बंडल, बॉन्ड पेपर असा 45 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कॅफे मकदुमीयाजवळ, अवचितपाडा, भिवंडी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखा कक्ष-2, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की काही व्यक्ती बनावट नोटा घेऊन अदलाबदली करण्याकरिता कॅफे मकदुमीयाजवळ, अवचितपाडा, भिवंडी या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक-2, भिवंडी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार व पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सुरज तानाजी शेडे, भरत वाळकु सासे, स्वप्निल जगदीश पाटील यांना 3 मे रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या ताब्यातून तीस लाख रुपयांच्या 500 रुपये च्या बनावटी नोटा, तसेच 60 बंडाले त्यातील प्रत्येकी बंडाला मध्ये रुपयाच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणे पोलिसांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियमन 2023 चे कलम 178(1),180,3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्याचा तपास गुन्हे शाखा घटक दोन करीत असताना अटकेतील आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांची ही माहिती दिली पोलिसांनी रामदास शालिक दळवी, विजय सुदाम कर्णेकर उर्फ विकी, शेखर रामदास बत्तीन यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी रामदास दळवी यांच्याकडे पोलिसांनी भिवंडी या ठिकाणी असलेल्या बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर, बनावट नोटांचे कच्च्या नोटांच्या मापात कटिंग करण्यात आलेले कटर, नोटा छापण्यासाठी लागणारा बॉण्ड पेपर व इतर 15 लाख 50 हजार रुपयांच्या बनावट नोटा इत्यादी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत संपूर्ण तपासात एकूण 45 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केले आहे.
हि कारवाई डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शोध -1 ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील,साबीर शेख, सुनिल साळुंखे,प्रशांत राणे, राजेश गावडे, किशोर थोरात, निलेश बोरसे, सचिन जाधव, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे,दक्षता सुतार, महिला पोलीस नाईक सायली गंभेरा, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार यांनी केली आहे.


