Mumbai Crime News : वनराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई – कोकेनसह नायजेरिया व आयव्हरी कोस्टचे दोघे विदेशी ताब्यात!

मुंबईत नवरात्रोत्सवाच्या काळात अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी वनराई पोलीस ठाणे व दहशतवाद विरोधी कक्षाचे पथक गस्त घालत असताना, २६ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ३.१५ वाजता पश्चिम एक्सप्रेस हायवेवरील व्हेटनरी हॉस्पिटल गेटसमोर पोलिसांनी एका मोटारसायकलवरील दोन विदेशी इसमांना संशयित हालचालींमुळे थांबवले.
तपासणीचा थरार
इंग्रजीत विचारपूस केली असता दोघांनी नाव व पत्ता सांगण्यास नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी कायदेशीर सोपस्कारांनंतर अंगझडती घेतली असता, एकूण ६ ग्रॅम कोकेन (बाजारमूल्य अंदाजे ₹१,५०,०००) असा घातक अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत हे दोघे इसम विक्रीसाठी कोकेन बाळगत असल्याचे उघड झाले.
👥 अटक आरोपी
1️⃣ सै. बी. राउल उर्फ उकेन्ना गोडवीन, वय ३१ वर्षे, नायजेरियन नागरिक
2️⃣ एनडुसी उमा अजा, वय २६ वर्षे, आयव्हरी कोस्ट नागरिक
(दोघेही रा. एम.टी.एन.एल. रोड, मिरा रोड, पालघर)
या दोघांविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांची चमकदार कामगिरी
ही धाडसी कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :
पोलीस आयुक्त, मुंबई : देवेन भारती
मा. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) : सत्यनारायण चौधरी
अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग : शशिकुमार मीना
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१२ : महेश चिमटे
सहाय्यक पोलीस आयुक्त, दिंडोशी विभाग : दत्तात्रय ढोले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पो.ठा. : गिरीश बने
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण तुपारे आणि त्यांचे पथक—पो.नि. महेश महाले, पो.ह. पाटील, साळुंखे, तेली, तसेच पो.शि. नवलू व शिंदे—यांनी थरारक पद्धतीने दोन्ही परदेशी आरोपींना जेरबंद करत मुंबईत कोकेनचा पुरवठा रोखला.


