Maharashtra Political Update : काँग्रेसच्या माजी आमदाराचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Political Latest Update : गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांचा शुद्ध गटात प्रवेश
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाकडून सुरुंग लावून महत्त्वाच्या नेत्यांना शिंदे गटात प्रवेश दिला जात आहे. काल गुरुवारी (13 फेब्रुवारी) रोजी ठाकरे गटाचे आणि उद्धव ठाकरे यांची अतिशय निष्ठावंत मानले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर लगेचच शिंदे काँग्रेसचा मोठा नेता आपल्या गळाला लावला असल्याचे पाहायला मिळाले आहे.


गोंदिया जिल्ह्यात सध्या काँग्रेस सह इतर पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली असून अनेक दिग्गज नेते हे विविध पक्षांमध्ये प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अर्जुनी मोरगाव विधानसभेचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबई येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजेच तिसऱ्या आघाडीकडून सुगत चंद्रिकापुरे यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आलेले अपयश सध्याच्या गळतीचे कारण असून काँग्रेस नेतृत्वावर काँग्रेस नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच पक्षात लागलेली गळती कशाप्रकारे थांबवता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.गेल्या काही महिन्यांत काँग्रेससह इतर पक्षांनाही गळती लागली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना पक्ष मजबूत होण्याच्या मार्गावर आहे.