क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

ACB Trap News : एसीबीचा महावितरणच्या कर्मचाऱ्यावर ‘शॉक’! वीज चोरी नाही, तर लाचखोरी! – मीटर काढल्यानंतर पुन्हा जोडणी करण्यासाठी वायरमनची 60 हजारांची मागणी; 40 हजार घेताना अटक

Nalasopra Latest Bribe Trap News : ‘थकीत बिल भरले, तरी कनेक्शनसाठी 40 हजारांची लाच!’; नालासोपाऱ्यात वायरमन रंगेहात जेरबंद

नालासोपारा :- सर्वसामान्य नागरिकांना वीज सेवा पुरवणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) मधील एका कर्मचाऱ्याच्या बेकायदेशीर कृत्याचा आज (16 ऑक्टोबर 2025) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पर्दाफाश केला आहे! Nalasopra Bribe News नालासोपारा (पूर्व) येथील वायरमन তথা तंत्रज्ञ राजेश रामप्रसाद सरोज (वय 45) याला एसीबीच्या पथकाने 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. Nalasopra ACB Trap News

मीटर जोडण्यासाठी 60 हजारांची ‘मागणी’

तक्रारदार एका सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीचे वीज मीटर थकीत बिलामुळे वायरमन राजेश सरोज याने 2 ऑक्टोबर रोजी काढून घेतले होते. तक्रारदार यांनी 7 ऑक्टोबर रोजी आपले संपूर्ण बिल भरले आणि वीज जोडणीसाठी सरोज यांना विनंती केली.

मात्र, सरोज याने मीटर परत बसवून देण्यासाठी त्यांच्याकडे थेट 60 हजार लाचेची मागणी केली! अखेर तडजोडीअंती 40 हजार देण्याचे निश्चित झाले.

एसीबीचा ‘वीज’वेगाने सापळा

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 12 ऑक्टोबर रोजी एसीबी, पालघर येथे धाव घेतली. एसीबीने पडताळणी केल्यानंतर आज, 16 ऑक्टोबर रोजी सापळा रचला. पंचांसमक्ष आरोपी राजेश सरोज यास 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. Vasai Virar Latest Bribe News

या कारवाईमुळे महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश झाला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयातील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. Vasai Virar Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0