क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai ACB Trap : ‘नैना’च्या भ्रष्टाचारावर एसीबीचा सर्जिकल स्ट्राईक! – 6 लाखांची लाच स्वीकारताना उपअधीक्षकासह निमतानदार जाळ्यात

Navi Mumbai ACB Latest Trap News : भूखंड मोजणीच्या ‘क’ पत्रासाठी मागितली होती 9 लाखांची खंडणी; सीबीडी बेलापूरमध्ये रंगला अटकेचा थरार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

नवी मुंबई :- नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फ्लुएन्स एरिया अर्थात ‘नैना’ (NAINA) प्रकल्पातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भूखंड मोजणीचा अहवाल देण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नैना भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक दिलीप तुळशीदास बागुले आणि निमतानदार कलिमुद्दीन रियाजुद्दीन शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. Navi Mumbai Latest ACB Trap News

नेमका काय आहे प्रकार?

एका नामांकित विकासकासाठी काम करणाऱ्या तक्रारदाराने ‘नैना’ क्षेत्रातील टीटीएस क्रमांक 1 मधील भूखंड क्रमांक 27 च्या मोजणीसाठी अर्ज केला होता. 3 डिसेंबर रोजी या भूखंडाची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, या मोजणीचा अधिकृत रिपोर्ट आणि ‘क’ पत्र देण्यासाठी निमतानदार कलिमुद्दीन शेख याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. या व्यवहारासाठी त्याने भूमी अभिलेखचे उपअधीक्षक दिलीप बागुले यांच्याशी तक्रारदाराचा संपर्क करून दिला.

तडजोड 9 लाखांची, अटक 6 लाखांवर

सुरुवातीला बागुले यांनी या कामासाठी 9 लाख रुपयांची अवाढव्य मागणी केली होती. मात्र, बऱ्याच वाटाघाटींनंतर हा व्यवहार 6 लाख रुपयांवर निश्चित झाला. तक्रारदाराने या भ्रष्टाचाराची माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.

गाडीत पैसे स्वीकारताना पडल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता. कलिमुद्दीन शेख याने तक्रारदाराच्या गाडीत बसून 6 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला झडप घालून पकडले. या कारवाईनंतर मुख्य सूत्रधार दिलीप बागुले (वय 55, रा. बदलापूर) आणि कलिमुद्दीन शेख (वय 27, रा. कामोठे) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मोठ्या रक्कमेच्या लाच प्रकरणामुळे ‘नैना’ कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0