Pune Breaking News : पुण्यात खळबळ! बुधवार पेठेतील लालबत्ती परिसरात तरुणाची चांगलीच फजिती

पुणे | शहराच्या कुख्यात बुधवार पेठ लालबत्ती परिसरात शुक्रवारी (12 सप्टेंबर) रात्री भीषण प्रकार उघडकीस आला. वेश्यागमनासाठी गेलेल्या एका 39 वर्षीय तरुणाला तिथल्या तीन महिलांनी चांगलाच चोप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात अक्षरशः खळबळ उडाली आहे. Pune Latest Crime News
पैशावरून वाद आणि मारहाण!
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारास दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
दत्तवाडीतील तमन्ना शाहरुख मुलाना (32)
बुधवार पेठेतील तनुजा हकीमअली मौल्ला (34)
तसेच सोनिया गुलाम शेख (32)
या तिघींनी फिर्यादी तरुणाला पैशाच्या वादातून बेदम मारहाण केली.
तरुणाची ऑनलाइन व्यवहाराद्वारे रक्कम देण्याची तयारी होती, मात्र पेमेंट अॅपचा पासवर्ड न आठवल्याने पैसे जमा होऊ शकले नाहीत. यावरून वाद पेटला. Pune Budhwar Peth Crime News
“पैसा नाही तर इकडे कशाला आलास?”
सुरुवातीला तमन्नाने संतापाने शिवीगाळ केली. यानंतर तिच्या साथीदार तनुजा आणि सोनिया या दोघीही धावून आल्या. तिघींनी मिळून तरुणाला आधी धक्काबुक्की केली आणि नंतर अक्षरशः चोप दिला.
पोलिसांत तक्रार
जखमी तरुणाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपी महिला पोलिसांच्या रडारवर आहेत. पुढील तपास सुरू आहे.
लालबत्ती परिसर पुन्हा चर्चेत
या घटनेनंतर लालबत्ती परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वेश्याव्यवसाय, पैसे आणि हिंसाचार यांचा गुंता पुन्हा एकदा उघड झाला आहे. पुणेकरांमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



