मुंबई

Mumbai Crime News : आर्थिक फसवणुकीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मृत्यूपूर्व चिठ्ठीमुळे चौघांविरोधात गुन्हा दाखल

•मृत्यूनंतर 20 दिवसांनी सापडलेल्या चिठ्ठीवरून मानखुर्द पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई | मानखुर्द परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील 29 वर्षीय तरुणाने आर्थिक फसवणुकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना घडल्यानंतर तब्बल वीस दिवसांनी मृत तरुणाच्या संगणकावरून एक आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यावरून पोलिसांनी आता चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तोहीद खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने साडेआठ लाख रुपये भरून एक दुकान भाड्याने घेतले होते. मात्र दुकानदाराने त्याला दुकानाचा ताबा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाहीत. या घटनेमुळे तोहीद सतत तणावात होता.

या दरम्यान, एका मैत्रिणीने पाठवलेल्या ऑनलाईन लिंकवरून त्याच्या खात्यातून 42 हजार रुपये लंपास झाले, शिवाय बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचे खाते बंद केले, ज्यात त्याचे 31 हजार रुपये अडकले. या सलग झालेल्या आर्थिक फसवणुकीमुळे तोहीदने 7 जून रोजी आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवले.

मृत्यूनंतर 20 दिवसांनी त्याच्या भावाला त्याच्या लॅपटॉपमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यात फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. या चिठ्ठीच्या आधारे मानखुर्द पोलिसांनी दुकानमालक, त्याची पत्नी, एक बँक कर्मचारी आणि तोहीदची मैत्रीण अशा चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0