Mira Road Bar Raid : मिरारोडच्या ‘ऐश्वर्या बार’वर धाड; 7 मुली अश्लील नृत्य करताना आढळल्या

Mira Road Police Take Action Against Illegal Bar : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार मालक, मॅनेजरसह 10 जणांवर गुन्हा दाखल ; काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेची मध्यरात्री कारवाई; 30 ग्राहक होते उपस्थित
मिरारोड :- मिरारोड पोलीस ठाणे Mira Road Police हद्दीतील ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार अँड Aishwarya Bar Mira Road रेस्टॉरंटमध्ये नियम डावलून अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा पथकाने मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत 7 मुली हिंदी गाण्यांवर नृत्य आणि अश्लील हावभाव करताना आढळून आल्या, तर काही मुली पळून गेल्याचे उघड झाले. Mira Road Police Latest News
काय आहे नेमके प्रकरण?
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा Kashmira Crime Branch Unit 1 यांना ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली होती. दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री पोलिसांनी या बारवर छापा टाकला.Mira Road Crime Branch
यावेळी बारमध्ये एकूण 30 ग्राहक उपस्थित होते. पोलिसांनी पाहणी केली असता, 7 मुली नाचत होत्या, तर 3 मुली मेकअप रूमच्या शेजारील बोळातून पळून जाताना आढळल्या.
मालकासह 10 जणांवर गुन्हा
याप्रकरणी बारचे चालक निकुंज रात्रा, मालक, मॅनेजर आणि पेटर्स यांनी संगनमत करून मुलींना नृत्य आणि अश्लील हावभाव करण्यास प्रवृत्त केले. तसेच, नियमापेक्षा जास्त मुली ठेवून कायदेशीर आदेशाचा भंग केला. यामुळे वर नमूद एकूण 10 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र डान्स बार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीराचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. Mira Road Kashmira Police Latest News


