ठाणेमुंबई

Sanjay Raut : ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊतांनी केली मोठी घोषणा, मुंबईसह अनेक ठिकाणी युतीची शक्यता

Sanjay Raut On Shivsena And MNS Yuti : ‘मराठी एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली’, बेस्ट निवडणुकीच्या निमित्ताने युतीचा पहिला प्रयोग

नाशिक :- आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटीगाठी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. याच चर्चांना बळ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये एक मोठं विधान केलं आहे.

“मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार,” अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकमध्येही दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसली आहे,” असे सांगून त्यांनी या संभाव्य युतीची राजकीय पार्श्वभूमी अधोरेखित केली.

बेस्ट निवडणुकीत युतीचा पहिला प्रयोग

ठाकरे बंधूंच्या युतीचा पहिला प्रयोग मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. या सोसायटीच्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ‘बेस्ट कामगार सेना’ आणि मनसेची ‘बेस्ट कामगार सेना’ एकत्र आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपच्या ‘सहकार पॅनल’सोबत थेट लढत होणार असून, भाजपच्या बाजूने मुख्यमंत्र्यांचे शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या भविष्यातील युतीसाठी एक महत्त्वाची चाचणी ठरू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0