मुंबई

Mira Road Sun Spa Center Busted : ‘सन स्पा सेंटर’वर मिरारोड पोलिसांची मोठी कारवाई; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

गरिबीचा फायदा घेऊन महिलांना वेश्याव्यवसायासाठी केले जात होते प्रवृत्त

मीरा रोड :- मीरा रोड पूर्वेकडील हाटकेश परिसरातील ‘सन स्पा सेंटर’ नावाच्या मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या सेंटरमध्ये महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना मसाजच्या नावाखाली वेश्यागमनासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे मीरा रोड पोलिसांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी कायदेशीर बाबी पूर्ण करून ‘सन स्पा सेंटर’वर छापा टाकला. पोलीस पथकाने केलेल्या तपासणीत सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा दाखल आणि आरोपींना अटक

या कारवाईनंतर पोलिसांनी तातडीने अलादीन ऊर्फ अलम हमीद शेख (वय 35), व्यवस्थापक स्वप्निल अरुण खरात (वय 27) आणि स्टाफमधील योगश गणेश रावल (वय 26) अशा तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिरारोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सय्यद जिलानी (क्राईम) यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0