“Delhi Police चा बनाव, Digital Arrest चा डाव!”

सायबर गुन्ह्यात १५ लाखांची फसवणूक – मुंबई सायबर पोलीसांची थरारक कारवाई, सांगलीचा आरोपी विकास चव्हाण अटक!
मुंबई प्रतिनिधी:- देशभरात थैमान घालणाऱ्या “Digital Arrest Fraud” प्रकाराला मुंबई सायबर पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत १५ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. Delhi Police Head Office मधून अधिकारी असल्याचे भासवून, “तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आहे” असे सांगून फिर्यादीकडून ₹१५ लाख रुपये उकळणाऱ्या टोळीतील एक आरोपी विकास संभाजी चव्हाण (वय २८, रा. सांगली) याला मध्य प्रादेशिक सायबर पोलीसांनी अटक केली आहे.
“Delhi Police” चा खोटा कॉल, “CBI Letterhead” वर बनावट Arrest Order!
१४ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान फिर्यादीला +91 8480751934 वरून कॉल आला.
स्वतःला Delhi Police चे DSP भुपेश कुमार व SP गोपेश कुमार असल्याचे सांगून त्यांनी
फिर्यादीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला आणि CBI चे बनावट लेटरपॅड, सही व शिक्क्यासह Arrest Order पाठवला.
“तुमचे नाव नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसशी जोडले गेले आहे,
ताबडतोब Fund Verification साठी रक्कम जमा करा, नाहीतर अटक होईल”
असे सांगून भीती दाखवत ₹१५ लाख रुपये Fedral Bank खात्यात (खाते क्र. 19660100058429) जमा करवले.
सायबर पोलिसांचा तपास – २०० जहाजांमधून शोध घेत आरोपी हाती!
सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत फसवणुकीचा माग काढला.
सदर रकमेतील ₹५ लाख Bank of Baroda (खाते क्र. 41188100003509) मध्ये वळते झाल्याचे निष्पन्न झाले.
या खात्याचा मालक विकास संभाजी चव्हाण असल्याचे समोर येताच, त्याला अटक करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत मुंबई व राजस्थानमध्येही त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.
आरोपी सध्या पोलीस कोठडीत – साथिदारांचा शोध सुरू!
मा. न्यायालयाने आरोपीस १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून
त्याच्या साथीदारांचा शोध सायबर पोलिसांनी सुरू ठेवला आहे.
ही कारवाई पार पाडणारे अधिकारी
देवेन भारती – पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
लखमी गौतम – सह पोलीस आयुक्त (गुन्हे)
शैलेश बलकवडे – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)
पुरुषोत्तम कराड – पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे
इरफान शेख – सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव,
तपासी अधिकारी पो.उ.नि. निलेश हैबाडे,
पो.ह. विकास तटकरे, अभिजीत गोंजारी, सुजीत सावंत
यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
सायबर पोलिसांचा इशारा – “Digital Arrest” पासून सावध राहा!
कोणतीही सरकारी संस्था “डिजिटल अटक” करत नाही.
भारतीय कायद्यात डिजिटल अटकेची तरतूद नाही.
अनोळखी व्यक्तीकडून आलेला व्हिडिओ कॉल स्वीकारू नका.
अशा कॉल्स आल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला भेट द्या किंवा सायबर हेल्पलाइन 1930 वर कॉल करा.
cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
“डिजिटल अटकेचा सापळा उधळला – मुंबई सायबर पोलिसांची धमाकेदार कामगिरी!”
सायबर ठगांच्या जाळ्यातून लाखो वाचवले – नागरिकांना इशारा, “फसवणुकीपासून सावध राहा!”


