Navi Mumbai Drug Racket : नवी मुंबईत गांजाची मोठी खेप जप्त! लाखोंच्या अंमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त, चार आरोपींना अटक

Navi Mumbai Latest Drug Racket Busted News : कळंबोलीतील डीडी धाब्याजवळ गुन्हे शाखेची कारवाई; स्विफ्ट कारसह 9.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई :- नवी मुंबईला ‘नशामुक्त’ करण्याच्या मोहिमेला गुन्हे शाखेने आणखी एक मोठे यश मिळवले आहे. Navi Mumbai Drug News मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईने कळंबोली परिसरात धाडसी कारवाई करत 5 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Navi Mumbai latest Crime News
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांना 15 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कळंबोलीतील रोडपाली लिंक रोड, डीडी धाब्याजवळ सापळा रचला. गांजा विक्रीसाठी आलेल्या चार आरोपींना पोलिसांनी त्यांच्या चारचाकी वाहनासह (Swift Dzire) तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण 5 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या गांजासह वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार आणि चार मोबाईल फोन असा एकूण 9 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या कारवाईनंतर कळंबोली पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या चार आरोपींचा पुढील तपास कळंबोली पोलीस ठाणे kalamboli Police News करत आहे. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे ही कारवाई केली आहे.


