Mira Road Chain Snacher News : मिरारोडमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ ; महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Mira Road Crime Branch Unit 1 Arrested Chain Snatcher : महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चैन लंपास, गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा पोलीसांनी आरोपींना अटक करण्यात यश आले आहे
मिरा रोड :- पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळांमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Mira Road Police अशीच एक घटना मिरा रोड परिसरातील आर.एल. कॉलेजच्या मागे सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन बाईकवरून येणाऱ्या दोघांनी हिसकावून फरार झाले आहे. Mira Road Crime Branch Unit 1 Arrested Chain Snatcher याबाबत मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर एल कॉलेजच्या मागे सालासार अवतार बिल्डिंग समोर सार्वजनिक रस्त्यावरून एक महिला मॉर्निंग वॉक करिता जात असताना तिच्या पाठीमागून दोन दुचाकीवरून भामटे येऊन तिच्या गळ्यातील चार तोळे वजनाची दोन लाख 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्ती खेचून त्या महिलेला धक्का देऊन तिथून पळ काढला. या घटनेत महिलेला हातापायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.निरज रामु राजनट (वय 25 रा. लक्ष्मी पार्क, मिरारोड पुर्व), सुनिल संजय राज (वय 22 रा. रामदेव पार्क, मिरारोड पुर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही कारवाई मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त,अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार संजय शिंदे, अविनश गर्जे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सुधीर खोत, अश्विन पाटील पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे किरण आस्वले तसेच, संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली.



