महाराष्ट्र

Thane Bribe News : ठाण्यात वनविभागाचे वनपाल व वनरक्षक लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अटक

ठाणे, दि. २८ ऑगस्ट : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी आज सापळा रचून वनपाल निलेश सिताराम श्रवणे (वय ४७) व वनरक्षक मच्छिंद्र प्रकाश सोनटक्के (वय २५) यांना २५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

तक्रारदार हा मोरपिस विक्री व्यवसाय करतो. दि. २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराच्या भावाला व ओळखीच्या लोकांना मोरपिस विकताना पकडून आरोपींनी त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व जप्त मोरपिस परत करण्यासाठी ५०,००० रुपयांची लाच मागणी केली होती. पडताळणी दरम्यान आरोपींनी तडजोड करून २५,००० रुपये घेण्यास तयारी दर्शवली.

आज (दि. २८) सापळा कारवाई दरम्यान आरोपी मच्छिंद्र सोनटक्के यांनी तक्रारदाराकडून २५,००० रुपये घेतले. त्यानंतर त्याला व वनपाल निलेश श्रवणे यांना एसीबीने ताब्यात घेतले.

या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०४/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) कलम ७ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0