महाराष्ट्रक्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Alibuag Murder News : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने प्रेयसीची हत्या केली

Alibag Latest Murder News : अलिबाग तालुक्यातील घटना; दोन वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रेमसंबंधाचा वापर

अलिबाग :- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी इथं घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक केली असून, रेवदंडा पोलीस ठाण्यात Revdanda Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

या घटनेतील मृत महिलेचे नाव अर्चना चंद्रकांत नाईक (वय 32) असून, आरोपीचे नाव दत्ताराम नागू पिंगळा (वय 40) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम आणि अर्चना यांचे प्रेमसंबंध होते, मात्र अर्चनाच्या काकांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून तिचे लग्न चंद्रकांत नाईक यांच्याशी लावून दिले होते.

या गोष्टीचा राग मनात धरून दत्तारामने 28 मार्च 2018 रोजी अर्चनाच्या काकांवर, तुकाराम सजन्या नाईक यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला होता. तुकाराम यांचा 31 मार्च 2018 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या गुन्ह्यासाठी दत्तारामला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दत्ताराम पॅरोलवर बाहेर आला होता. सोमवारी (1 सप्टेंबर) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो अर्चनाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तिथे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर त्याने रागाच्या भरात अर्चनाचा दोरीने गळा आवळून खून केला आणि तो जंगलात पसार झाला.

पोलिसांची तात्काळ कारवाई

या घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी दत्ताराम पिंगळाला आदिवासीवाडीजवळील जंगलातून ताब्यात घेतले. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0