Navi Mumbai Sex Racket : ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पाच पीडितांची सुटका

Navi Mumbai Sex Racket Busted : नवी मुंबईत छापा; तिघे अटकेत, दलालांचा शोध सुरू,साईटवरून बुकिंग, व्हॉट्सअॅपवर फोटो, लॉजवर वेश्याव्यवसाय
नवी मुंबई | नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police ऑनलाईन साईटद्वारे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच पीडित महिला/मुलींची सुटका करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest Crime News
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मोबाईलवरून गूगलवर शोधल्यास schloka.com, empirescort.com, kokqa.com या वेबसाईटवरून थेट व्हॉट्सअॅप लिंक मिळत होती. या लिंकवर चॅट केल्यानंतर ग्राहकांना महिला निवडण्यासाठी फोटो पाठवले जात होते व पाच तासांसाठी 4 हजार रुपये मोबदल्यात मुली उपलब्ध करून दिल्या जात होत्या.
या माहितीच्या आधारे 8 जुलै रोजी रात्री 11 वाजता तुर्भेतील ‘हॉटेल गोल्डन ओक’मध्ये पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. त्यावेळी एका महिलेची उपस्थिती आणि तिच्या चौकशीतून राजेशकुमार मुन्ना यादव याचे नाव पुढे आले. तोच या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्याला वाशी परिसरातून ताब्यात घेतले.
यावेळी महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नेरुळमधील ‘म्हात्रे निवास’ येथे छापा टाकून आणखी दोन पीडित मुलींची सुटका केली. त्याठिकाणी त्यांना ठेवून ग्राहकांच्या मागणीनुसार विविध लॉजवर नेले जात होते. या प्रकरणी शंभु उपाध्याय, बॉबी उर्फ मकबुल अन्सारी (दोघेही दलाल) व मुकेश राय (रिक्षाचालक) यांची भूमिका समोर आली.
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दिनेश डांगी आणि मुकेश राय यांनाही अटक केली. या तिघांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात बीएनएस व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शंभु उपाध्याय, बॉबी अन्सारी व धीरू हे तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे, उप आयुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक निरीक्षक योगेश देशमुख, अलका पाटील, उपनिरीक्षक सरिता गुडे आणि त्यांच्या पथकातील जवान सहभागी होते.


