मुंबई

Gautam Gambhir : गौतम गंभीरने सिद्धिविनायक गणपतीचे घेतले दर्शन

•Gautam Gambhir At Siddhivinayak Temple भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी घेतले बाप्पांचे आशीर्वाद

मुंबई :- भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आहेत. गौतमने त्यांची पत्नी नताशा जैन यांच्यासोबत मंदिरात पूजा केली.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. गंभीरने त्याच्या एक्स अकाउंटवर पत्नीसोबत सिद्धिविनायक मंदिराचा फोटोही शेअर केला आहे.

गुरवार, (15 मे ) रोजी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी सहपत्नीक “श्रीं” चे दर्शन घेतले. यावेळी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर, राज्यमंत्री दर्जा यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत न्यासाचे कार्यकारी अधिकारी वीणा पाटील व उप कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप राठोड हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0