Panvel Sex Racket : कळंबोलीत ‘पती’च पत्नीला वेश्याव्यवसायात ढकलत होता, पोलीस कारवाईत पर्दाफाश

Panvel Sex Racket Busted : आर्थिक अडचणीतून गैरधंदा सुरू, आरोपीला अटक करून कायदेशीर नोटीस
पनवेल :- कळंबोली उपनगरात एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या धक्कादायक घटनेमध्ये एका पतीनेच आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपल्या पत्नीला या गैरधंद्यात ढकलले असल्याचे समोर आले आहे. Panvel Police Latest News
ही घटना कळंबोली, सेक्टर-५ येथील एका बैठ्या चाळीतील खोलीत सुरू होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या गैरधंद्यात गुंतलेला दलाल काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या नवनिर्माणासाठी हिरहिरीने काम करत होता. मात्र, आर्थिक चणचणीमुळे त्याने हा मार्ग निवडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारामुळे कळंबोली उपनगर हादरले आहे.
पोलिसांनी रचला सापळा
नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला या गैरधंद्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी मुंबईतील एका व्यक्तीला बनावट गिऱ्हाईक बनवून दलालाशी फोनवरून संपर्क साधला. एका महिलेसाठी 10 हजार रुपये ठरल्यानंतर, 13 सप्टेंबर रोजी दलालाला दोन हजार रुपये ॲडव्हान्स पाठवण्यात आले.
सायंकाळी 4 वाजता बनावट गिऱ्हाईक पोलिसांच्या पथकासह कळंबोलीत पोहोचले. गिऱ्हाईकाने दलालाला फोन केला असता, त्याने पत्ता दिला. उर्वरित आठ हजार रुपये दिल्यानंतर बनावट गिऱ्हाईकाने पोलिसांना मेसेज पाठवला आणि पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पथकात महिला पोलीसही होत्या.
पतीच निघाला मुख्य दलाल
पोलिसांनी घरात छापा टाकून चौकशी केली असता, दलाल स्वतःच्या पत्नीलाच या गैरधंद्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या 46 वर्षीय दलाल व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हा चुकीचा निर्णय घ्यावा लागल्याचे पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात kalamboli Police Station ‘स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956’ च्या कलम 3,4,5, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी संबंधित आरोपीला न्यायालयात उपस्थित राहण्याची प्रतिबंधक नोटीस बजावून सोडून दिले आहे.


