क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Police News : मुंबईत तीन ठिकाणीच्या कारवाई 03 बांगलादेशी नागरिकांना अटक

Mumbai Police On Illegal Bangladeshi Migrants : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांसह इतर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मुंबई केलेला कारवाई तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिला अनधिकृतपणे भारतात मुंबईत वास्तव्य करत होते

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-4 Mumbai Unit 4 च्या हद्दीत केलेला कारवाईमध्ये पोलिसांनी तीन ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी भोईवाडा, आर.ए. किडवाई मार्ग, ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. Three Illegal Bangladeshi Arrested यामध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

भोईवाडा पोलीस ठाण्याच्या Bhoiwada Police Station हद्दीत घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. रुकसाना बेगम मोह
अबुल खान, (30 वय) असे महिलेचे नाव असून सिंम्प्लेक्स बिल्डींग पाववाला स्ट्रीट ग्रॅन्टरोड या परिसरात राहणारी होती. तिच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात नागरिक कायदा 1946 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर.ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईत निजाम इकराम शेख (वय 41) भगीरथी अपार्टमेंट, मतराली रोड, शिवाजी तलावा जवळ, घणसोली गाव, ठाणे येथे राहत असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीला वडाळा परिसरातून अटक केली आहे. आरोपी काही वर्षांपासून मुंबईत मिस्त्री चे काम करतो. त्याच्या विरोधात परकीय नागरीक कायदा 1946 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ॲटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मिंटो इसम शेख (38 वय) याला पोलिसांनी अटक केली आहे. वडाळ्याच्या लालमिट्टी किस्मत नगर परिसरात राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात परकीय नागरिक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलीस पथक

विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सत्यनारायण, सह पोलीस आयुक्त (का. व सु.), बृहन्मुंबई, अनिल पारस्कर, अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई, रागसुधा आर., पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर धायगुडे व पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल बच्छाव व पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक होळकर व पथक यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0