महाराष्ट्र
Trending

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर ‘तीन तडाखेबंद कारवाया’; ड्रग्स, वन्यजीव आणि सोने जप्त!

Mumbai Airport Latest Crime News : एकाच दिवशी चौघांना अटक; 11 कोटींपेक्षा अधिक माल जप्त

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 जुलै 2025 रोजी मुंबई सीमाशुल्क विभागाच्या (झोन-III) अधिकाऱ्यांनी सलग तीन मोठ्या कारवाया करून चौघा आरोपींना अटक केली. या प्रकरणांत ड्रग्स, दुर्मिळ वन्यजीव व सोनं असा एकूण 11 कोटींहून अधिक किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई NDPS, वन्यजीव संरक्षण कायदा आणि कस्टम्स कायदा यांच्या अधीन करण्यात आली आहे. Mumbai Airport Latest Crime News

विशेष गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईहून बँकॉकला गेलेल्या आणि पुन्हा भारतात परतलेल्या भारतीय प्रवाशाच्या चेक-इन बॅगेत 9.66 किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ (Weed) आढळून आला. या गांजाची बाजारातील अवैध किंमत तब्बल 9.66 कोटी रुपये आहे. आरोपीला NDPS कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दुर्मिळ प्राणी जीवंत आणि मृत अवस्थेत जप्त

दुसऱ्या कारवाईत, बँकॉकहून आलेल्या आणखी एका प्रवाशाच्या बॅगमध्ये दुर्मिळ प्रजातींचे जीवंत व मृत वन्यजीव आढळले. यात –

1 जीवंत रॅकून व 3 मृत रॅकून

3 मृत ब्लॅक फॉक्स स्क्विरल

29 जीवंत आणि 8 मृत ग्रीन इगुआना

अशा सजीव प्राण्यांचा समावेश होता. हे प्राणी भारतात स्वदेशी नसल्याने त्यांना मूळ देशात परत पाठविण्यासाठी विमान कंपनीच्या कर्मचार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आलं. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि कस्टम्स कायदा 1962 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून 1.65 किलो सोनं हस्तगत

तिसऱ्या कारवाईत दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून त्यांच्या शरीरात लपवून आणलेलं 24 कॅरेट सोनं – डस्ट आणि गोल्ड पीस स्वरूपात – एकूण वजन 1.650 किलो जप्त करण्यात आलं. याची बाजारातील किंमत सुमारे 1.49 कोटी रुपये इतकी आहे. या दोघा प्रवाशांवर कस्टम्स कायदा 1962 अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0