
Karmala MLA Jaywant Jagtap has also joined Shiv Sena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत अधिकृत प्रवेश; करमाळ्यात राजकीय समीकरणे बदलणार
मुंबई | सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप होत, करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. Karmala MLA Jaywant Jagtap मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर शिंदे यांनी स्वतः त्यांचे पक्षात स्वागत केले. नुकतेच काँग्रेस नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही या गटात प्रवेश केल्याने सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाची घोडदौड सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.



जयवंत जगताप हे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते नामदेवराव जगताप यांचे पुत्र असून, 1990 मध्ये अपक्ष म्हणून तर 2004 मध्ये शिवसेनेकडून निवडून आले होते. करमाळा तालुक्यात गटबाजीच्या पार्श्वभूमीवरही ते अजूनही 15 हजार मतांचे राजकीय समीकरण ठरवू शकतात. मागील निवडणुकांत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.
जगताप यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती व सोलापूर जिल्हा सहकारी बँकेवरही ठसा राहिला आहे. त्यांचा पक्षप्रवेशाच्या वेळी सांगोल्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, महेश चिवटे व मंगेश चिवटे आदी नेते उपस्थित होते. बागल गटही आता दोन तुकड्यांत विभागले गेले असून, दिग्विजय बागल शिंदे गटात तर रश्मी बागल भाजपमध्ये कार्यरत आहेत.


