क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Gadchiroli Maoist Surrender : महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल; माओवादी नेता ‘सोनू’सह 61 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Gadchiroli Maoist Surrender : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण सोहळा; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांच्या ताब्यात ; पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ ‘सोनू’च्या सामूहिक आत्मसमर्पणामुळे चळवळीला मोठा धक्का

गडचिरोली :- माओवादविरोधी लढ्यात गडचिरोली पोलिसांनी आज (15 ऑक्टोबर) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. कुठल्याही प्रकारचा रक्तपात न होता, माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ ‘सोनू’ उर्फ भूपती याच्यासह तब्बल 61 जहाल माओवाद्यांनी आज शस्त्रे खाली ठेवत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोलीच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी सामूहिक शरणागती मानली जात आहे. Gadchiroli Maoist Surrender

या आत्मसमर्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. शरण आलेल्या माओवाद्यांनी त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणात असलेला शस्त्रसाठाही मुख्यमंत्र्यांसमोर खाली ठेवण्याची तयारी केली आहे.

माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर असलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ ‘सोनू’ला नक्षल चळवळीचा ‘मेंदू’ समजला जातो. त्याच्या या मोठ्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माओवादी नेता सोनू उर्फ भूपती याने नुकतीच “सशस्त्र माओवादाचा मार्ग सोडून सरकारसोबत शांतता वार्ता करून मुख्य प्रवाहात यावे” अशी भूमिका मांडली होती, जी या सामूहिक आत्मसमर्पणामागे निर्णायक ठरली. मंगळवारी (14 ऑक्टोबर) रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात, छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले.

सोनू उर्फ भूपती याच्यासह इतर दोन जहाल माओवाद्यांनीही आज शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्याही रक्तपाताशिवाय मिळालेला हा विजय गडचिरोली पोलिसांच्या ‘नक्षल निर्मूलन’ धोरणाचे मोठे यश दर्शवतो. या सामूहिक आत्मसमर्पणामुळे नक्षलवादी चळवळीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0