Mumbai Crime News : मुंबईतून गजाआड ‘कॅश रॉबरीचा डॉन’! शिवा शेट्टी अखेर जेरबंद

Mumbai Gangster Shiva Shetty Arrested : नांदेड-लातूरमधील 6 कोटींच्या रोकड चोरीप्रकरणी ‘मोस्ट वाँटेड’ गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या
मुंबई | देशभरातील पोलिसांना गुंगारा देत फिरणारा आणि तब्बल 6 कोटी रुपयांच्या दोन जबरी चोरी प्रकरणात ‘मोस्ट वाँटेड’ असलेला कुख्यात गँगस्टर शिवा रामण्णा शेट्टी (वय 46, रा. गोकुळधाम, दिंडोशी) Gangster Shiva Shetty Arrested याला मुंबईच्या आरे कॉलनीतून अटक करण्यात आली. त्यास नांदेड व लातूर जिल्ह्यांतील पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आपल्या ताब्यात घेतले. Mumbai Latest Crime News
नांदेड गाव पोलिस ठाण्यात आणि लातूरच्या किनगाव पोलीस ठाण्यात या दोन गंभीर चोरीच्या प्रकरणांमध्ये शिवा शेट्टी प्रमुख आरोपी आहे. या गुन्ह्यांत भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांनुसार (309(4), 140(2), 126(2), 324(4), 352, 351, 3(5) व 310(2)) त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.
सहकारी आरोपीसह 6 कोटींची लूट
शेट्टी आणि त्याच्या टोळीने मिळून नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोकड लंपास केली होती. त्यामध्ये एकूण लुटीचा अंदाज 6 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अनेक दिवसांपासून पोलिस शोध घेत होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील (आरे पोलिस ठाणे, मुंबई) यांनी यशस्वी कारवाईची माहिती दिली. गुन्हेगारी जगतात परिचित असलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे नांदेड व लातूरमधील उद्योगपतींमध्ये एक प्रकारचा दिलासा निर्माण झाला आहे.


