Ulhasnagar Crime News : उल्हासनगरात पोलिसांकडून अट्टल बाईक चोराला बेड्या, 8 बाईक चोरी केल्याचे काबुली

•विठ्ठलवाडी, मध्यवर्ती, उल्हासनगर आणि हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची आरोपीकडून कबुली
उल्हासनगर :- उल्हासनगरात विठ्ठलवाडी पोलिसांनी अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या चोराच्या अटकेने बाईक चोरीच्या 8 बाईक चोरी केल्याची कबुली दिली आहे. हितेश मोहन कटेजा (23 वय,रा. उल्हासनगर-2) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. विठ्ठलवाडी पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे त्यांना एक इसम संशयास्पदरित्या आढळून आला आहे.त्यामुळे त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो अट्टल बाईक चोर असल्याचं समोर आलं.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक दराडे, पोलीस हवालदार मिसाळ आणि पोलीस शिपाई राठोड हे सीसीटीव्ही फुटेजचा तपास घेत असताना त्यांना संशयित आरोपी हितेश कटेजा याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता हितेश यांनी पोलिसांना बाईक चोरी बाबत कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला बाईक चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असून आरोपीने यापूर्वी विठ्ठलवाडी, उल्हासनगर, मध्यवर्ती आणि हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार लाख 25 हजार रुपये किमतीच्या आठ बाईक चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तसेच आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपारही करण्यात आले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस पथक
सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त, उल्हासनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक दराडे व पोलीस शिपाई राठोड यांनी केलेली आहे.



