मुंबई

Rahul Narvekar : विधिमंडळात फक्त सदस्य व अधिकृत कर्मचारीच! अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय

•मारहाणीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांचा स्पष्ट आदेश — अभ्यागतांना प्रवेश बंद

मुंबई | विधानभवन परिसरात दोन सदस्यांच्या अभ्यागतांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानमंडळाच्या परिसरात आता अधिवेशन काळात फक्त सदस्य, अधिकृत स्वीय सहायक आणि शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर कोणत्याही अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे, असे अध्यक्षांनी सभागृहात जाहीर केलं.

या घटनेची चौकशी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे अध्यक्षांनी सांगितले. “विधानमंडळ हे एक संविधानिक मंदिर आहे. येथे कायदा, शिस्त आणि शपथ यांचे गांभीर्य राखले पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तसेच, अनेकदा मंत्र्यांकडून विविध बैठकांसाठी अभ्यागतांना विधानभवनात बोलावले जाते, त्यासंदर्भातही अध्यक्षांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “यापुढे अशा बैठकांसाठी मंत्र्यांनी मंत्रालयातील कार्यालयाचा उपयोग करावा, आणि अत्यावश्यक असल्यासच सभापती व अध्यक्षांच्या मान्यतेनंतरच प्रवेश दिला जाईल,” असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0