मुंबईठाणे
Trending

Maharashtra News : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अजित दादांच्या निधनाने सभागृह हळहळणार, शोकप्रस्तावावर राज्याचे लक्ष

Maharashtra Session Latest News : उद्धव ठाकरे विधान परिषदेत राहणार उपस्थित | 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प | रोहित पवारांकडून घातपाताचा संशय कायम

मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, 23 फेब्रुवारीपासून मुंबईतील विधानभवनात सुरुवात होत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने आजचा पहिला दिवस अत्यंत भावूक असण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहांत आज स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येणार असून, राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

25 मार्चपर्यंत चालणार कामकाज; 6 मार्चला अर्थसंकल्प

कामकाज सल्लागार समितीने या अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित केला असून, हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्याचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च 2026 रोजी सादर केला जाईल. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि सध्याचे आरोप-प्रत्यारोप पाहता, हे अधिवेशन ऐतिहासिक आणि वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे आणि शोकप्रस्ताव
शिवसेना (ठाकरे) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उपस्थित राहणार आहेत. विशेषतः अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी ते सभागृहात उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीतील ऋणानुबंध पाहता, उद्धव ठाकरे यांचे आजचे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे.

अपघाताचे सावट आणि रोहित पवारांचे प्रश्न

28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी नुकताच घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. “विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन का होते?” आणि “वैमानिक सुमित कपूर यांनी विमान मुद्दाम जमिनीवर आदळले का?” असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांचे पडसाद आज आणि पुढील काही दिवस सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.

29 जानेवारीला बारामतीत झालेल्या अंत्यसंस्कारावेळी जनसागराचा महापूर लोटला होता. तोच जनभाव आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर पाहायला मिळत असून, सरकार या अपघात प्रकरणी कोणती स्पष्टीकरणे देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0