Share Market Fraud : शेअर मार्केटच्या आमिषातुन ‘अपहरण’ झालेले पैसे परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश

Mira Road Police Latest Cyber Crime News : डिसेंबरपासून सायबर पोलिसांनी तपास घेऊन फिर्यादीची रक्कम त्या खात्यात वर्ग!
मिरा रोड :- शेअर मार्केटच्या आमिषातून Share Market Fraud 29 लाख 80 हजार रुपयांची ऑनलाईन अपहरण करून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काश्मीरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police News हद्दीत राहणाऱ्या सोबत झाली होती. याबाबत त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाला तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी चार महिने तपास करून त्या रकमेपैकी काही रक्कम मिळवून दिली. पोलिसांकडून तेवढ्या रकमेचा धनादेश दिले आहे. Mira Road Latest Crime News
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार 52 वर्षीय यांना आदित्य बिर्ला मनी या फेक शेअर ट्रेडिंग ॲप मार्फत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा कसा मिळेल असे अमिष दाखवून तक्रारदार यांनी डिसेंबर, 2024 मध्ये वेगवेगळ्या बैंक खात्यामध्ये रक्कम पाठविल्याने एकूण 29 लाख 80 रुपयांची गुंतवणूक केली. तक्रारदार यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांची फसवणुक झाल्याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहून तक्रार दिली त्याबाचत तात्काळ NCCRP PORTAL वर ऑनलाईन नोंद केली होती.
त्यानंतर गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे सोपविला. डिसेंबरपासून सायबर पोलिसांनी तपास करून एकूण रकमेपैकी 8 लाख 81 हजार 454 रुपये परत मिळवून दिले. फिर्यादीची रक्कम ज्या खात्यात वर्ग झाली,त्यातील रक्कम बँकांना पत्रव्यवहार करून थांबवली. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी ते रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा केली आहे.रक्कम परत मिळाल्यावर फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले.

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे,,सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक,प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे.



