पुणे
Trending

Pune Breaking News : पुणे राष्ट्रवादीत मोठा फेरबदल: टिंगरे आणि जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती

Pune Latest Political update ; अपघाताच्या वादातून बाहेर पडलेल्या टिंगरे यांचे पुनर्वसन;पूर्व विभागाची जबाबदारी टिंगरे यांच्यावर; पश्चिमेस जगताप यांना संधी

पुणे :- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष विस्ताराच्या दृष्टीने पुणे शहर कार्यकारिणीत मोठा फेरबदल करत दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. रविवारी ही नावे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. NCP Political Appointment Latest Update

पूर्व पुण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांची, तर पश्चिम भागासाठी माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या करताना जातीय आणि राजकीय समीकरणांचा विचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पोर्शे अपघात प्रकरणात अप्रत्यक्षपणे झटका बसलेल्या टिंगरे यांना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

या दोघांच्या मदतीला कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख (पूर्व विभाग) आणि प्रदीप देशमुख, अक्रूर कुदळे (पश्चिम विभाग) यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सर्वांना नियुक्तीपत्रे प्रदान केली, तर आमदार चेतन तुपे यांनी ही नावे जाहीर केली.

यापूर्वी दीपक मानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. त्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असतानाच अजित पवार यांनी धक्कातंत्र राबवत दोन शहराध्यक्षांची नियुक्ती करून नव्या जोमाने पक्ष संघटनात्मक तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्ष स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ही नियुक्ती होणे, यालाही खास राजकीय महत्त्व आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीचा आणि पक्ष बळकटीकरणाचा हा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0