क्राईम न्यूजठाणेमुंबई

Baba Siddique murder case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जीशान अख्तर कॅनडामध्ये अटकेत!

Baba Siddique murder case: पोलीस तपासात फर्जी पासपोर्ट आणि नेपाळमार्गे पलायनाचा संशय

मुंबई | एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जीशान अख्तर याला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. Baba Siddique murder case काही दिवसांपूर्वीच जीशान अख्तर कॅनडामध्ये डिटेन झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्याची अधिकृत अटक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई क्राइम ब्रँचनुसार, हत्या झाल्यानंतर जीशान अख्तर थेट फरार झाला होता. पोलीस त्याच्या पळून जाण्याच्या मार्गाचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, त्याने फर्जी पासपोर्टचा वापर करून देशाबाहेर पलायन केले असण्याची शक्यता असून, तो नेपाळ मार्गे कॅनडामध्ये पोहोचला असावा, असा पोलीसांचा संशय आहे.

मुंबईच्या वांद्रे परिसरात 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या ऑफिसबाहेर गोळ्यांचा मारा करण्यात आला होता. गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम या तिघांनी मिळून ही हत्या केली होती. घटनेनंतर गुरमेल व धर्मराजला लोकांनी पकडले, तर शिवकुमार पळून जाण्यात यशस्वी झाला होता. नंतर तो उत्तर प्रदेशातील बहराइच येथे पकडण्यात आला.

तपासात उघड झाले की या तिघांनी हत्या करण्यापूर्वी दोन महिन्यांपर्यंत सिद्दीकी यांच्या घराबाहेर आणि ऑफिसबाहेर रेकी केली होती. त्यांच्या जवळ नेहमी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असत. हल्ल्याच्या रात्री त्यांनी संधी साधून थेट फायरिंग केले.

या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई टोळीने घेतली असून, बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खान यांचे जवळचे मित्र असल्यामुळे ही हत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यावर्षीच मुंबई क्राइम ब्रँचनं या प्रकरणात तब्बल 4,590 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0