
•Nilesh Rane On Raj Thackeray :“उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही; नमो टुरिझमवर आक्षेप असल्यास सरकारकडे मांडा,” आमदार राणेंचे प्रत्युत्तर
मुंबई :- मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी काल झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर ‘नमो टुरिझम सेंटर’च्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे Nilesh Rane यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लाचारीबद्दल बोलायचे झाल्यास राज ठाकरे यांनी स्वतःच्या भावाकडे बघावे, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
‘उद्धव ठाकरेंपेक्षा लाचार कोणी नाही’
राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले, “लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही. राज ठाकरे साहेबांबत आम्हाला आदर आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही.” लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये, 2019 ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती, अशी टीका त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
नमो टुरिझम सेंटरवर मत स्पष्ट
शिवाजी महाराजांच्या गडावर ‘नमो टुरिझम सेंटर’ काढण्याच्या राज ठाकरेंच्या आक्षेपाला उत्तर देताना राणे म्हणाले, “नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा. महाराजांच्या नावावर राजकारण करू नये.”
विनायक राऊतांवर टीकास्त्र
यावेळी निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावरही टीका केली. “कोण विनायक राऊत? विनायक राऊत कोकणात जे घडू नये ते घडवण्याच्या मानसिकतेने येतात. त्यांना महत्त्व देत नाही. बाहेरच्या लुंग्या-पुंग्यांनी आम्ही काय करावे ते सांगू नये. आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही तुमचं बघा तुम्हाला उमेदवार मिळतील का बघा?” अशा शब्दांत त्यांनी विनायक राऊत यांना सुनावले.
युतीबद्दल भूमिका
आगामी निवडणुकीतील युतीबद्दल बोलताना निलेश राणे Nilesh Rane म्हणाले की, उद्या भाजप आणि आमचे प्रमुख नेते एकत्र बैठक घेणार आहोत. “राणें साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. युती झाली तर एकत्र, नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


