Pune Police Transfer | पुणे पोलीस दलात वरिष्ठांच्या बदल्यांची संगीत खुर्ची सुरूच ! स्वारगेट, चतुःशृंगी, खडकी,सहकारनगर, विश्रामबाग…
Pune Police Inspector Transfer
- पोलीस आयुक्तांची पॉलिसी… अधिकाऱ्यांची धावपळ
पुणे, दि. २२ जुलै, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Police Transfer, Pune Crime News, Pune Police News
पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची संगीतखुर्ची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरूच ठेवली आहे. मात्र यात अधिकाऱ्यांची धावपळ होत आहे. काल दि. २१ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यात स्वारगेट, चतुःशृंगी, खडकी,सहकारनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात नवीन निरीक्षकांना संधी देण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांची पॉलिसी…
पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांनी दक्षता घेतली आहे. गेल्या काही कालावधीत पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली आहे. वाघोली येथील जमीन बनावट कागदपत्र प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी खबरदारी घेण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या पुढील प्रमाणे –
१. संतोष लक्ष्मण पांढरे – पोनि गुन्हे शाखा ते वपोनि विश्रामबाग पोलीस ठाणे
२. विठ्ठल शंकर पवार – पोनि गुन्हे उत्तमनगर पोलीस ठाणे ते वपोनि सहकारनगर पोलीस ठाणे
३. यशवंत गणपतराव निकम – पोनि सायबर ते वपोनि स्वारगेट पोलीस ठाणे
४. उत्तम ज्ञानू भजनावळे – पोनि गुन्हे सिंहगड रोड ते वपोनि चतुःशृंगी पोलीस ठाणे
५. विक्रमसिंग दत्तात्रय कदम – पोनि गुन्हे कोथरूड ते वपोनि खडकी पोलीस ठाणे
६. दिलीप मागासेठ फुलपगारे – वपोनि खडकी ते पोनि वाहतूक शाखा
७. विजयमाला महादेव पवार – वपोनि विश्रामबाग ते पोनि वाहतूक शाखा
८. राहुल विक्रमसिंग गौड – वपोनि सहकारनगर ते पोनि वाहतूक शाखा
९. युवराज अशोक नांद्रे – वपोनि स्वारगेट ते पोनि वाहतूक शाखा
१०. उल्हास गुलाबराव कदम – वपोनि चतुःशृंगी ते पोनि गुन्हे सिंहगड रोड
११. जितेंद्र विठ्ठल कदम – पोनि गुन्हे भरती विद्यापीठ ते पोनि गुन्हे विश्रामबाग
१२. दत्ताराम गोपीनाथ बागवे – पोनि गुन्हे खडकी ते पोनि गुन्हे विश्रांतवाडी



