ठाणेक्रीडामुंबई
Trending

Thane City Police : 35 व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांच्या खेळाडूंचा दबदबा

Thane City Police Latest News : खोखो, कबड्डी, स्पर्धेत मुंबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई पोलीस खेळाडूंची दमदार कामगिरी

ठाणे :- 35 व्या ‘महाराष्ट्र पोलीस क्रीडा Maharashtra Police Sports Competition स्पर्धा’ 12 वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहे. Thane City Police या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेणार आहे. हॉकी, फुटबॉल, धावणे, जलतरण, बॉक्सिंग यासारख्या 18 स्पर्धा ठाण्यात भरविल्या जाणार आहे. 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत स्पर्धा होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर खेळाडूचे वर्चस्व कायम राहिले आहेत. खोखो आणि कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर पोलिसांचा दबदबा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणत्या स्पर्धेत कोणत्या संघाचे वर्चस्व?

फुटबॉल (पुरुष) एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र विरुध्द नागपूर शहर, कोल्हापूर परिक्षेत्र विरूध्द प्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या सामन्यात नागपूर शहर, प्रशिक्षण संचालनालय हे संघ विजयी झालेले आहेत.

कबड्डी (पुरुष) प्रशिक्षण संचालनालय विरुध्द कोल्हापूर परिक्षेत्र, नवी मुंबई/मिरा भाईंदर व कोकण परिक्षेत्र विरूध्द एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र यांच्यात झालेल्या सामन्यात कोल्हापूर परिक्षेत्र, नवी मुंबई/मिरा भाईंदर व कोकण परिक्षेत्र हे संघ विजयी झालेले आहेत.

खो-खो (पुरुष) मुंबई शहर विरूध्द कोल्हापूर परिक्षेत्र, नागपुर शहर विरुध्द प्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई शहर व प्रशिक्षण संचालनालय हे संघ विजयी झालेले आहेत.

खो-खो (महिला) प्रशिक्षण संचालनालय विरुध्द कोल्हापूर परिक्षेत्र, पुणे शहर व पिपंरी चिंचवड विरुध्द मुंबई शहर यांच्यात झालेल्या सामन्यात प्रशिक्षण संचालनालय, मुंबई शहर हे संघ विजयी झालेले आहेत.

कबड्डी (महिला) पुणे शहर व पिपंरी चिंचवड विरुध्द नागपूर परिक्षेत्र, नागपूर शहर विरुध्द मुंबई शहर यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे शहर व पिपंरी चिंचवड व मुंबई शहर हे संघ विजयी झालेले आहेत.

तायक्वांदो (पुरुष) 54 कि. वजन गटाच्या सामन्यात अनिकेत बिटला, पुणे शहर व पिपंरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 63 कि. वजन गटाच्या सामन्यात मयुर शिंदे, पुणे शहर व पिपंरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 74 कि. वजन गटाच्या सामन्यात तुषार सिनलकर, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 87 कि. वजन गटाच्या सामन्यात सचिन शिंपी, एस.आर.पी.एफ. परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

पॉवरलिफ्टिंग (पुरुष) 59 कि. वजन गटाच्या सामन्यात रितेश यादव, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम कमांक पटकाविला. 66 कि. वजन गटाच्या सामन्यात रोहित पाटील, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 74 कि. वजन गटाच्या सामन्यात संतोष पवार, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

तायक्वांदो (महिला) 46 कि. वजन गटाच्या सामन्यात सिमा यादव, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 53 कि. वजन गटाच्या सामन्यात सोनाली खोबरे, मुंबई शहर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 62 कि. वजन गटाच्या सामन्यात स्वप्नाली घेमुड, पुणे शहर व पिपंरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 73 कि. वजन गटाच्या सामन्यात किरण खांडेकर, प्रशिक्षण संचालनालय यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

पॉवरलिफ्टिंग (महिला) 47 कि. वजन गटाच्या सामन्यात संगिता ढोले, अमरावती परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 52 कि. वजन गटाच्या सामन्यात पुजा सोनावणे, ठाणे शहर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 57 कि. वजन गटाच्च्या सामन्यात योगिता बागुल, लोहमार्ग परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 63 कि. वजन गटाच्या सामन्यात मनिषा शिंदे, ठाणे शहर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0