मुंबई

Shahpur Bribe News : उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली 30 हजारांची लाच

•30 हजारांची लाच स्वीकारताना, खर्डी, तालुका शहापूर येथील उपसरपंचास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

शहापूर :- तालुक्यातील खर्डी येथील घराचे घरपट्टी नावे बदलून देण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना खर्डी येथील उपसरपंचास रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार शहापूर तालुक्यातील खर्डी येथे नवीन घर घेतले होते. मात्र, घराच्या नावाची घरपट्टी बदलून देण्यासाठी उपसरपंच मोसिम मुर्तूजा शेख (37 वय) यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस रुपयांची लाच मागितली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी शहापूर तालुक्यातील खर्डी गावात नवीन घरा खरेदी केली होते. त्या घराची घरपट्टी तक्रारदार यांच्या नावे करून देण्याकरिता उपसरपंच असलेले खर्डी ग्रामपंचायतचे मोसिम मुर्तूजा शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचून उपसरपंच मोसिम मुर्तूजा शेख यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अशी माहिती पोलीस निरीक्षक (एसीबी, ठाणे) सचिन मोरे यांनी दिली आहे. तसेच ही कारवाई शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक (एसीबी ठाणे),सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक (एसीबी ठाणे),संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक (एसीबी ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0